सेवावर्धिनी, पुणे व सिमेन्स गमेसा इंडिया फौंडेशन यांनी संयुक्तपणे आखलेल्या समृद्धी या महिला सक्षमीकरण प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रम गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०१९ रोजी ११ ते ५ या वेळात यशराज मंगल कार्यालय, उस्मानाबाद या ठिकाणी संपन्न झाला.

Sevavardhini    30-Aug-2019
सेवावर्धिनी, पुणे व सिमेन्स गमेसा इंडिया फौंडेशन यांनी संयुक्तपणे आखलेल्या समृद्धी या महिला सक्षमीकरण प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रम गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०१९ रोजी संपन्न झाले
 
 
 
 
 
 


उद्घाटन कार्यक्रम गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०१९ रोजी ११ ते ५ या वेळात यशराज मंगल कार्यालय, उस्मानाबाद या ठिकाणी संपन्न झाला. 
या प्रसंगी पुढील मान्यवर उपस्थित होते -
• मा. श्री. आर. राजा - जिल्हा पोलीस अधीक्षक 
• मा. श्री. सोमदत्त पटवर्धन - कार्यवाह, सेवावर्धिनी 
• श्रीमती पद्माताई कुबेर - कार्यकारिणी सदस्य, सेवावर्धिनी 
• श्रीमती. कांचनताई परुळेकर - संस्थापिका, स्वयंसिद्धा महिला मंडळ 
• मा. श्री. अरुण प्रसाद - CSR Head सिमेंस गमेसा रिन्युवेबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड 
• मा. श्री. पृथ्वीराज पाटील - सर्विस स्टेट हेड, सिमेंस गमेसा रिन्युवेबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड 
• मा. श्री. अभय बाबर - सर्विस एरिया इनचार्ज, सिमेंस गमेसा रिन्युवेबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड 
• मा. श्री. दिलीप माने - साईट इनचार्ज, सिमेंस गमेसा रिन्युवेबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड 
• मा. श्री. संजीव म्हेत्रे - अॅसेट मॅनेजर, रिन्यू पॉवर 
• मा. श्री. अमोल कुंभार - असीस्टंट मॅनेजर, टोरंट पॉवर 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी भारतमाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन केले. प्रतिमा पूजन झाल्यांनतर सर्वांचे स्वागत करण्यात आले. कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण देवाचे स्मरण करतो व काम यशस्वी करण्यासाठी शक्तीची मागणी करतो यासाठी सर्वांनी ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’ हे गीत म्हटले.
• सेवावर्धिनीच्या मुख्य व्यवस्थापक मा. गीता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकामध्ये बोलताना सेवावर्धिनीच्या कामाचे स्वरूप सांगितले. समृद्धी प्रकल्पात काम करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील २३ गावांची निवड केली आहे. महिलांच्या आर्थिक विकासाबरोबरच सर्वागीण विकासासाठी संस्था प्रयत्न करणार आहे असे सांगितले.
• सिमेंस गमेसा रिन्युवेबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे CSR विभागाचे Sr. Executive मा. श्री. प्रवीण शिंदे यांनी कंपनीचे भारतभरातील कामाचे स्वरूप सांगितले तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सांगितली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये 200 बेंच व स्कुल कीट वाटप असे वैविध्यपूर्ण उपक्रम २०१५ पासून राबवित आहे. समृद्धी प्रकल्प सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यातील २३ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. महिलेच्या आर्थिक उन्नतीबरोबरच गावाचा सर्वागीण विकास होण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. 
• मा. संजीव म्हेत्रे व मा. अमोल कुंभार यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सर्वप्रकारे सहकार्य करू असे आश्वासन दिले. 
• कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. आर. राजा हे मराठी भाषिक नसूनही त्यांनी महिलांशी मराठीतून संवाद साधला. सर्व सामान्य लोकांना पोलिसांची भीती वाटते, परंतु चुकीचे काम न करणाऱ्या कोणीही पोलिसांना घाबरण्याचे कारण नाही. पूर्वी महिला अशिक्षित होत्या त्यामुळे आर्थिक बचत करणे, स्वतःचा विकास या विषयी जागरूक नव्हत्या. आता बचत गटाच्या माध्यमातून महिला विकसित होत आहेत. महिलांच्यामुळे त्यांचा घराचा, गावाचा तसेच देशाचा विकास होऊ शकेल. सेवावर्धिनीच्या कामाला व समृद्धी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. 
• दिवसभराच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कांचनताई परुळेकर व त्यांचे सहकारी यांनी बचतगट स्थापना, संचालन व उद्योगनिर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सत्रामध्ये आकाशकंदील, मेणबत्ती बनविणे, पॉपकॉर्न बनविणे, केळीच्या - आंबाडीच्या वाकापासून तयार करण्यात येणारी विविध उत्पादने कशी बनवावीत? याचे प्रात्यक्षिक दाखविले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मूल्य कसे काढावे? आकर्षक पॅकिंग कसे करावे? मार्केटिंगच्या संधी कशा शोधाव्यात? या विषयी प्रात्यक्षिकाच्या आधारे माहिती दिली. 
• सेवावर्धिनीच्या कार्यकारिणी सदस्या मा. पद्मा कुबेर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप केला. आगामी काळात प्रत्येक गावामध्ये सखीची निवड केली जाणार आहे व त्यांच्यामार्फत प्रत्येक गावाचा अभ्यास पूर्ण करून व्यवसाय करण्याची विविध प्रशिक्षणे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत असे सांगितले. 
या कार्यक्रमाला १८ गावातून २८० महिला उपस्थित होत्या.