पालाणे भूमिपूजन

Sevavardhini    05-Apr-2019

शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ रोजी पालाने(मांढरदेव) ता. वाई जिल्हा सातारा या गावामध्ये कॉंक्रीट टाकीचे भूमिपूजन सेवावर्धिनीचे कार्यवाह श्री सोमदत्त पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. ही १५ लाख लिटर क्षमतेची टाकीचे काम ONGC कंपनीच्या CSR फंडातून होणाऱ आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला मांढरदेवगावचे सरपंच श्री शंकर (आबा) मांढरे, सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रमोद कुलकर्णी, सहकार्यवाह सौ. माणिकताई दामले, श्री योगेश्वर गर्गे, श्री देवदत्त टेंभेकर प्रोजेक्ट मॅनेजर श्री हर्षन पाटील व श्री ओंकार पंडित उपस्थित होते. यावेळी ज्यांनी या कामासाठी आपली जमीन दिली असे श्री विठ्ठलराव ढेबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी गावातील माजी ग्राम पंचायत सदस्य श्री बापूराव धायगुडे, बबन कोकरे, सर्व गावकरी उपस्थित होते.