Waste Management

MVWebsite1    15-Mar-2018
 
 
महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, हिंगणे , पुणे. या संस्थेत सेवावर्धिनी ने तांत्रिक सल्ला देवून सुरु केलेला उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे सॅनेटरी नॅपकिन्सची स्वच्छतापूर्वक विल्हेवाट.
 
 
सॅनिटरी नॅपकिन्सची स्वच्छतापूर्वक विल्हेवाट लावणे हे महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेस तसेच शहरांमधील निवासी महिला आस्थापनांसाठी, याचप्रमाणे नगरपालिकांसाठी हा एक मोठा डोकेदुखीचा प्रश्न झालेला आहे. यासाठी सेवावर्धिनीने चेन्नई येथील मे. लक्ष्मी असोसिएटस यांनी विकसित केलेले सॅनिटरी नॅपकिन्स स्वच्छतापूर्वक, प्रदूषण विरहित पद्धतीने जाळण्याचे (Incinerator) यंत्र वापरले आहे. यामध्ये परिणामकारकता, आर्थिक फायदा, पर्यावरणाशी निगडीत कायदेशीर बाबी या सर्वांचा विचारपूर्वक अभ्यास करूनच हे यंत्र बसवून घेण्याचा सल्ला दिला गेला. या यंत्राद्वारे संस्थात्मक, प्रशासकीय तसेच नागरी स्वच्छतेचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे उदाहरण पुढे ठेवून अशा संस्थांना हा विषय हाताळता येईल अशी आशा आहे.