Waste Management

MVWebsite1    15-Mar-2018
 

 
 
आजकाल घन कचरा व्यवस्थापन किंवा त्याची विल्हेवाट लावणे हे मोठ्या नगर पालिका व महानगर पालिक़ांसमोर एक डोकेदुखी झाली आहे. या कामा साठी या संस्थांजवळ मनुष्य बल आहे , ते मुख्यत: समाजातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या तळागाळातील वर्गाचे आहे.
 
 
याशिवाय कांही रोगी , आणि भटक्या व विमुक्त जातींचे लोक खेड्यात पोट भरत नसल्यामुळे व नोकरी –व्यवसाय करण्यालायक कौशल्य नसल्यामुळे कचरा वेचून त्यातमिळालेले कागद , कांच , पत्रा, लोख़ंड वगैरे गोळा करून भंगार वाल्यांना विकतात व यमिळणा-या तुट्पुंज्याउत्पन्नावर गुजराण करत्तात. ऍवढ्या उत्पन्नात कुटुंबाचा उदर निर्वाह होत नसल्याने , कुटुंबातील सर्वलहान मोठे या कामात उतर्तात . परिणामी आरोग्याची हेळसांड ( किम्बहुना जाणिवपूर्वक दुर्लक्ष),सावकारी पाशात गुंतणे , असामाजिक तत्वांबरोबरच्या जाळ्यात गुरफटणे , पोलिस केसेसला सामोरे जाणेव गुन्हेगारीला व दुर्व्यसनांना निर्ढावणे,हे त्यांच्या युवक पिढीचे भवितव्य ठरते.
 
 
हे सर्व पाहून लातूर शहरातील एक युवक , श्री संजय कांबळे याच्या मनात एक विचार आला कि आपण एक सुशिक्षित समाज म्हणून यांच्यासाठी काहीच करू शकणार नाही कां?
 
 
त्यादृष्टीने त्यांनी या भटक्या विमुक्त समाजातील काही जणांची भेट घेवून त्यांची माहिती करून घेतली. कागद ,काच , पत्रा विक्रीच्या व्यवसायास थोडे संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. पण यात प्रत्येकास पोटापुरते उत्पन्न मिळत नाही हे दृष्टीस आल्यावर संघटना करून प्रत्येकास पुरेसे काम आणि पुरेसे उत्पन्न मिळण्याची हमी दिल्यावर हे लोक एकत्र येवू लागले. हे झाल्यावर मात्र त्यांची आपापसातील भांडणे व भंगारवाल्यांकडून होणारे शोषण थांबवण्यात (कमीकरण्यात)थोडे यश आले .
 
 
त्यानंतर पुढे काय काम करायचे हा प्रश्न उभा राहिला असता त्यांचा सेवावर्धिनीशी संबंध आला व लातूर महापालिके चे पूर्ण शहराचे कचरा वेचण्याचे कंत्राट (Contract) घेण्याची कल्पना पुढे आली . या कामी सेवावर्धिनी संस्था बांधणी , नोंदणी वगैरे साठी लागणारे तांत्रिक सहाय्य पुरविले. या सर्व कामाचे सर्वेक्षण ,कामाचा आराखाडा ,तसेच पुढील प्रकल्पाचा अहवाल बनवून दिला.
 
 
प्रत्यक्ष कामात काम करणा-रा सदस्यांची नोंदणी व त्यांना कामाचे योग्य वाटप करून देण्यात आले . यांत 3-4 कचरावेचकांचा गट बनवून त्यांना एक घंटा गाडी, व प्रत्येकी साठी(यात महिला सदस्या बहुसंख्येने आहेत) सरंक्षक ऍप्रन , हातमोजे , मास्क देण्यात आले . लोक संख्येवर आधारित भागावर एक 2-3 गल्ल्यांसाठी एक घंटा गाडी व ठराविक वेळ नेमून देण्यात आली आहे .
 
 
प्रत्येक घरातून ओला ( जैविक) व कोरडा( कागद ,कांच , पत्रा वगैरे) कचरा वेग-वेगळा करून येणे अपेक्षित आहे. तसे प्रबोधन केले जाते. ऎकत्र केलेला कचरा महापालिकेने नेमून दिलेल्या जगी ट्रक ने नेला जातो . कोरड्या कच_याची मालकी संस्थेची असते. तो विकून येणा-या पैशाचे समान वाटप केले जाते. काही निधी , संस्था चालनासाठी व नवीन योजना अमलात आणण्यासाठी वापरला जातो.
 
 
सध्या संस्थेने आरोग्य तपासणी , बालवाडी, रात्र शाळा , व स्वयंसहाय्य गट स्थापन केले आहेत . या वर्गातील बरीच युवक व पुरुष मंडळी वसमनाधीन व सावकारी पाशात अडकल्यामुळे त्यांच्यासाठी देखील संस्था काम करते . हे करत असतांनाच मुलांवर संस्कार करणे , व शिक्षणासाठी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे महत्वाचे काम केले जाते. या संस्थे मुळे ब-याच कुटुंबांना स्थैर्य आणि रोजगार मिळाला असून मुलांवर चांगले संस्कार , शिक्षण , रोग मुक्ती हे फायदे मिळत आहेत .