ग्रामीण रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा
Sevavardhini   07-Dec-2018

 

 

 
ता. २६/११/२०१८ रोजी काळदरी गावात रोटरी कल्ब शनिवारवाडा, पुणे मेट्रो व सेवावर्धिनी, पुणे यांच्या वतीने ग्रामीण रोजगार या विषयाची कार्यशाळा घेण्यात आली. या प्रशिक्षणात काळदरी गावातील ७० महिला सहभागी झाल्या होत्या. या प्रशिक्षणात दुग्ध व्यवसाय, बंदिस्त शेळी पालन व कुक्कुटपालन ह्या विषयात मार्गदर्शन करण्यात आले. ह्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी श्री. कैलास जाधव व श्री. प्रसाद देवधर हे आले होते.

ह्या प्रशिक्षणानंतर व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांनी आपली नाव नोंदणी करावी असे सांगण्यात आले. ह्या नोंदणीमध्ये गावातील ६३ महिलांनी नोंदणी केली आहे. पुढील काही महिन्यात या महीलांना व्यवसाय करण्यासाठी रोटरी कल्ब शनिवारवाडा, पुणे मेट्रो व सेवावर्धिनी, पुणे हे नक्की मदत करतील.