दिनांक २४ ऑगस्ट २०१९ रोजी सेवावर्धिनी संस्थेमार्फत 'भटक्या विमुक्त जाती जमाती च्या अल्पभधारक शेतकरी बांधवासाठी उपजीवीकेचे साधन आणि विषमुक्त शेती'करण्याकरिता संगोपन करणेसाठी "मोफत गाय वाटप कार्यक्रम" मुळे सभागृह,हरिभाई प्रशाले जवळ,सोलापूर येथे घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापुरचे खासदार श्री जयसिद्धेश्वर महाराज,पालकमंत्री श्री विजयकुमार देशमुख आणि सेवावर्धिनी संस्थेचे कार्यवाहक श्री पटवर्धन ,श्री हर्षन पाटिल,श्री प्रमोद कुलकर्णी,श्री कल्लुरकर,यांच्या सहकार्याने पार पडला.गोसेवा, गोपालन,गोसंवर्धन विषयी प्रमुख वकते श्री मिलिंद देवल,पुणे आणि खिल्लार गाय पालन बाबत श्री शशिकांत पुदे,शेजबाबुळगाव,मोहोळ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सोलापूर मधील विविध गोशालाचे पदाधिकारी,सोलापूर सेवा सहयोग,प्रांतीय मारवाड़ी युवा मंच,जनमित्र सेवा संस्था चे प्रतिनिधि, कार्यकर्ते, गोपालक, गोसेवक विविध संस्थेचे प्रमुख मान्यवर ,पारधी, भटके विमुक्त विविध जाती,जमातीचे बांधव,महिला वर्ग,विविध महिला बचत गटाचे पदाधिकारी आणि सदस्या,सेवावर्धिनी पुणे चे मुख्य कार्यवाहक आणि पदाधिकारी, सदस्य टीम यांची उपस्थिति होते.